Click Here...👇👇👇

बोर्डा झुल्लुरवार येथे 45 वर्षांवरील नागरिकांना कोविड -19 लसीकरणाची राहुल संतोषवार सदस्य जि.प. चंद्रपूर यांच्याकडुन पाहणी.

Bhairav Diwase
माजी अर्थ व नियोजन मंत्री तथा आमदार मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या तर्फे गावातील नागरिकांना सुरक्षितता म्हणून मास्क वाटप.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- केमारा देवाडा जिल्हा परिषद चे सदस्य राहुल संतोषवार यांच्या उपस्थित आज दिनांक 23/4/2021 ला स 11:00 वाजता ४५ वर्षावरील नागरिकांना कोविड-19 चे प्रतिबंधात्मक लसीकरण देण्यात आले. माजी अर्थ व नियोजन मंत्री तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या तर्फे गावातील नागरिकांना सुरक्षितता म्हणून मास्कच वाटप करण्यात आले.

ग्रामीण भागातील जनतेमध्ये उत्स्फूर्तपणे लसीकरणाचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे. राहुल संतोषवार यांनी सर्व नागरिकांनी लसीकरण करण्याचे आव्हान त्यांनी केले. नेहमी मास्क चा वापर करावे, सॅनिटायजर, साबून ने सतत स्वच्छ हात धुवावे, विनाकारण बाहेर फिरू नये. असे आव्हान त्यांनी केले. शिबिराला सरपंच गौतम रामटेके, उपसरपंंच संजयज ढोंगे, ग्रामसेवक बि.एम.पेंदोर, पोलिस पाटील विकास रामटेके, राकेश गव्हारे उपस्थित होते.