दुकानाच्या वेळा सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत.

Bhairav Diwase
0





(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत हॉस्पीटल, दवाखाने, मेडीकल, पॅथॉलॉजी, रक्तपेढी व तत्सम आस्थापना वगळता सर्व दुकाने, आस्थापना, मार्केट दररोज सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहतील असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी काल दिले आहेत.

नवीन नियमावलीनुसार रेस्टॉरंट व हॉटेल बैठक क्षमतेच्या 50 टक्के ग्राहकांच्या उपस्थित सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहतील तसेच त्यांना रात्री 11 पर्यंत घरपोच सेवा सुरू ठेवता येईल.

            शासकीय कार्यालयांमध्ये गर्दी कमी होण्याच्या दृष्टीकोनातून लोकप्रतिनीधी व्यतिरिक्त इतर अभ्यागतांना तातडीच्या कामाशिवाय परवानगी दिली जाऊ नये. सर्व धार्मीक स्थळाच्या व्यवस्थापनाने जागेच्या उपलब्धतेनुसार एका तासाकरिता प्रवेश देण्यात येणाऱ्या अभ्यागतांची संख्या निश्चित करावी. अभ्यागतांकरिता ऑनलाईन आरक्षणासारख्या सोयीची सुरवात करावी. तसेच या ठिकाणी प्रवेशाकरिता मास्कचा वापर बंधनकारक राहील. तसेच प्रवेशस्थळी तापमान मोजण्याचे साधन, परिसरातील प्रत्येक ठिकाणी हात धुण्याकरिता साबन अथवा सॅनिटायजर्स ठेवावी.
यापुर्वीच्या नियमांसोबतच वरील निर्देशांचे पालन करावे. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीतांविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड संहिता, साथरोग कायदा व व इतर संबंधीत कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांचे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)