Top News

गोंडपिंपरी नगरपंचायत मुख्याधिकारी व अभियंता यांना त्रासून तीन कामगारांनी दिला आत्मदहनाचा इशारा.

(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) राहुल थोरात
गोंडपिपरी:- सविस्तर वृत्त असे की जय भवानी कामगार संघटनेच्या माध्यमातून गोंडपिंपरी नगरपंचायत मधील समस्त सफाई कर्मचाऱ्यांच्या किमान वेतन व शासनाकडून मिळत असलेल्या सुविधा समस्त कर्मचाऱ्यांना मिळावा त्या करतात तीन महिन्यांपासून घटनेच्या चौकटीमध्ये व कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आंदोलन सुरू आहे यामध्ये सदर सफाई कर्मचारी हे गेल्या दोन महिन्यात दोन वेळा उपोषणास बसले व दोन्ही वेळा नगरपंचायत नेले की स्वरूपी मागण्या मान्य करून त्यांना उपोषण यापासून परावृत्त केले परंतु नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी विशाखा शेळके व अभियंता स्वप्निल पिदुरकर तसेच ठेकेदार भूषण ईटणकर यांनी आपल्या प्रतिष्ठेचा अहंकाराचा मुद्दा बनवत जाणीवपूर्वक दोन वाहन चालक नामे १) धीरज दुर्गे व २)करण गेडाम तथा सफाई कर्मचारी१) जीवन दास चीलन कर यांना जाणीवपूर्वक व हेतूपुरस्पर अजून पर्यंत कामावर घेतले नाही व नगरपंचायत ने एकदा नव्हे तर दोनदा लेखी स्वरूपी किमान वेतन कायदा मान्य करण्याचे कबूल करुन देखील किमान वेतन प्रमाणे कुणालाही वेतन दिले नाही याकरता कामगारांच्या व त्यांच्यासाठी लढत असलेल्या जय भवानी कामगार संघटनेच्या बाजूने दिनांक१६/०३/२०२१ रोजी साहेब कामगार आयुक्त चंद्रपूर यांनी आदेश पारित केला तसेच कामगार मंत्रालयाकडे सर्वेक्षण न करता व निरीक्षण करिता तसेच संबंधित कागदपत्र तपासणी करीता परवानगी देखील मागितली आहे व लवकरच ही परवानगी प्राप्त झाल्याबरोबर नगरपंचायत गोंडपिंपरी यांची कामगारांना संदर्भातील सर्वच कागदपत्रे तपासून त्यातील त्रुटी काढून साहाय्यक कामगार आयुक्त हे कामगारांच्या थकीत असलेला पगार व्याजासह देण्याचे आदेश देणार आहेत आणि यामुळेच या तिन्ही कामगारांना जाणून-बुजून हेतूपुरस्पर कामावर घेण्यात आले नाही अखेरीस कामगारांनी आत्मदहनाचा इशारा नगरपंचायत गोंडपिंपरी यांच्या मुख्याधिकारी विशाखा शेळके तथा गुण पिंपरी नगरपंचायत चे अभियंता स्वप्निल पिदुरकर व ठेकेदार भूषण ईटनकर यांच्या त्रासाला कंटाळून अखेर आठ दिवसांमध्ये त्यांना कामावर न घेतल्यास व किमान वेतन याप्रमाणे वेतन न दिल्यास गोंडपिपरी नगरपंचायत त्याच्यासमोरच आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्र त्यांनी माननीय जिल्हाधिकारी यांना दिले तथा नगर पंचायत समोर आत्मदहन न करून दिल्यास घरी जाऊन फाशी घेऊन आत्महत्या करू असा इशारा देखील त्यांनी आज दिलेल्या पत्रात दिला आहे यावर जय भवानी कामगार संघटनेचे सुरज ठाकरे यांनी नगरपंचायत गोंडपिंपरी तथा ठेकेदार यांना धमकीवजा इशारा दिला आहे की जर कामगारांचे काही बरेवाईट झाले तर नगरपंचायत ला कुलूप लावू व नगरपंचायत चे कामकाज बंद पाडू शासन आदेश दिल्यानंतर देखील शासनाच्या आदेशाचे पालन न करणारे गुन्हेगारच आहेत व शासकीय अधिकारी जर शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करीत नसतील तर अशा अधिकाऱ्यांना कामावरून हटवून टाकायला पाहिजे अशी मागणी जय भवानी कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरज ठाकरे यांनी केली आहे. प्रेमाची भाषा आता जर नगरपंचायत ला समजत नसेल तर नेताजी सुभाष चंद्र बोस व चंद्रशेखर आझाद यांचा मार्ग आम्हाला पत्करावा लागेल असा धमकीवजा इशारा सुरज ठाकरे यांनी आज एका पत्रकात दिला आहे आठ दिवसांच्या आत मध्ये जर मान्य केलेल्या सर्व मागण्या अमलात आणला नाही तर मोठे हिंसक आंदोलन उभारू असा इशारा जवानी कामगार संघटनेने दिला आहे.
नगरपंचायत गोंडपिंपरी येथील मुख्याधिकारी विशाखा शेळके अभियंता स्वप्नील पिदुरकर व ठेकेदार भूषण ईटणकर हे आत्महत्येस प्रवृत्त करीत असल्याने आम्ही आत्महत्या केल्यास यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील कामगारांनी पत्रकामध्ये केली आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने