विद्यार्थिनीला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या शिक्षकाला अटक.

Bhairav Diwase
0

(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) राहुल थोरात
चंद्रपुर:- आजकाल सगळीकडे शिक्षण क्षेत्रात बाजरीकरण झाले असल्याने नैतिकता ही जवळपास संपल्यात जमा आहे अशातच गुरु शिष्य यांच्यातील पवित्र नात्याला सुद्धा कलंकित करण्याचे अनेक प्रकार नेहमीच प्रसारमाध्यमामधे प्रसारित होत असतात असाच एक गुरु शिष्य यांच्यातील हा प्रकार चंद्रपूर शहरात घडला असून शहरातील भवानजीभाई चव्हाण हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकाने लैंगिक सुखासाठी नकार देणाऱ्या विद्यार्थिनींचा मानसिक छळ करून अश्लिल शिवीगाळ केल्याची चिंताजनक घटना घडली आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हितेश मडावी या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.

हितेश मडावी हा शिक्षक ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली ग्रामीण भागातून शिक्षणासाठी आलेल्या आदिवासी विद्यार्थिनींकडे सातत्याने शारीरिक सुखासाठी मागणी करीत होता. त्या विद्यार्थिनीला अश्लिल संदेश पाठविणे, अश्लिल फोटो पाठविणे तसेच फोन करून सतत विद्यार्थिनींना त्रास देणे सुरू होते. मात्र, या विद्यार्थिनीने शिक्षकाच्या या मागणीला दाद दिली नाही पर्यायाने शिक्षकाचा पारा चढला आणि मद्यधुंद होऊन शिक्षकाने रंगपंचमीच्या दिवशी शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात जावून धिंगाणा घातला. हा प्रकार मुलीला सहन झाला नसल्याने त्या विद्यार्थिनींने आपल्या पालकाना हा प्रकार सांगितला. त्यामुळे पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे आणि पोलिसांकडे तक्रार नोंदविली. आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेता रामनगर पोलिसांनी हितेश मडावी या शिक्षकाला अटक केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)