Top News

देवदूतरुपी गजुभाऊ कुबडे यांच्यामुळे वृद्धेला मिळाले नवजीवन.


Bhairav Diwase. April 30, 2021
वर्धा:- सद्यस्थितीत जगभरात कोरोना महामारी सुरू आहे.या काळात रक्तनात्यालाही एकमेकांचा विसर पडलेला असतांना अतिशय बिकट परिस्थितीत येथील एक बैरागी मात्र स्वीकारलेले व्रत निष्ठतेने जपत रुग्णसेवा हीच ईश्वरी सेवा समजून कोरोनाच्या थैमानातही रुग्णसेवेत मग्न आहे.
यासंबंधीची मिळालेल्या माहितीनुसार सगळीकडे कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. सर्व हॉस्पिटल पेशंटनी तुडुंब भरले आहे. बेड मिळण्यास प्रचंड त्रास होत आहे. रोज बेड साठी रुग्ण फिरत आहे पैसे असून ही हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाही आहे.त्यामुळे कोरोना रुग्णासोबतच विविध आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णाना हा त्रास सहन करावा लागत आहे.हिंगणघाट येथील अर्जुन बावरी यांची आजी रतनकौर बावरी यांना अचानक हृदयाचा त्रास झाल्याने त्यांना सेवाग्राम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले परंतु त्यांच्या तपासण्या केल्यावर सेवाग्राम येथील डॉक्टर यांनी त्यांच्यावर हृदयावर शस्त्रक्रिया करण्याच्या सल्ला दिला परंतु कोरोना काळ असल्याने ही शस्त्रक्रिया आपल्या रुगणालयात होणार नसल्याचे सांगितले ही शस्त्रक्रिया नागपूर येथे करण्याच्या सल्ला दिला व या शस्त्रक्रिये करीत 2 लाख पन्नास हजार रुपयांपर्यंत खर्च सांगितला परंतु बावरी परिवार सामान्य असल्याने एवढ्या पैश्याची जुळवाजवळ करणे शक्य नव्हते यातच अर्जुन बावरी यांनी ही हताश होऊन आपली समस्या हिंगणघाट येथील प्रहारचे विदर्भ प्रमुख रुग्णमित्र- गजुभाऊ कुबडे यांना सांगितली रुग्णमित्र- गजुभाऊ कुबडे यांनी नागपूर येथे तीन चार हॉस्पिटलमध्ये बोलणे केले परंतु कोरोना मुळे यश आले परंतु शेवटच्या प्रयत्न यशस्वी झाला नागपूर येथील सुप्रसिद्ध हॉस्पिटल रतनकौर बावरी यांना भरती करून त्यांचा वर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली व आता त्यांना हॉस्पिटल मधून सुट्टी पण झाली ही शस्त्रक्रिया मोफत झाली असून शस्त्रक्रियेला एक ही रुपया खर्च आला नाही.
केवळ रुग्णमित्र गजू कुबडे यांच्या सहृदयतेने एका गरीब महिलेला जीवनदान मिळाले व २ लाख ५० हजाराची शस्त्रक्रिया ही मोफत करण्यात रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यशस्वी झाले.
यासाठी रतनकौर बावरी यांचा परिवाराने व मित्र परिवाराने रुग्णमित्र- गजुभाऊ कुबडे यांचे आभार मानले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने