Top News

भारतीय जनता पार्टी पोंभुर्णाचा आत्मा हरपला:-अल्का आत्राम.



पोंभुर्णा:- स्व.गजानन गोरंटीवार भाजपा तालुकाध्यक्ष यांचे 28/04/2021 ला दुःखद निधन झाले. आज भाजपा पोंभुर्णा कार्यालय पोंभुर्णा येथे त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला. स्व. गजानन गोरंटीवार यांनी तालुक्यातील विविध विकास कामे तसेच भाजप पार्टी साठी सर्वस्व अर्पण करून काम केले आणि कार्यकर्त्याचा गळ्यातील ताईत असलेले गजूभाऊ यांना यावेळी भारतीय जनता पार्टी पोंभुर्णा, भारतीय जनता पार्टी महिला आघाडी पोंभुर्णा, युवा मोर्चा पोंभुर्णा यांचे वतीने कोरोनाचे सर्व नियम पाळत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने