Top News

नगराध्यक्षांच्या आवाहनाला रोटरी क्लबचा प्रतिसाद.

हॅंडग्लोव्ज आणि ऑक्सिजन फ्लोमीटर देऊन दिला मदतीचा हात.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती तालुका कोरोनाचा हाॅटस्पाॅट झाला असून रोज १०० च्या वर कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर आणि प्रशासनावर ताण येत आहे. याच पार्श्वभूमिवर नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील रोटरी क्लबने येथील जैन मंदिर स्थित कोविड सेंटरला ५००० हॅंडग्लोव्ज आणि १० आॅक्सिजन फ्लोमीटर देऊन मदतीचा हात दिला.
यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ.मनीष सिंग, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष विनोद कामड़ी, सचिव प्रवीण महाजन, डिस्ट्रिक्ट रीजनल चेअरमन भाविक तेलंग, सदस्य प्रकाश पिंपळकर, हनुमान घोटेकर, डॉ प्रवीण केसवानी, सुनील पोटदुखे, डॉ. माला प्रेमचंद, मदन ताठे, सुधीर पारोधे, अब्बास अजानी, किशोर खंडालकर, , विक्रांत बिसेन, आस्वाले साहेब, प्रशांत तेलंग, युवराज धानोरकर, तुषार सातपुते, सुरेंद्र राउत, आनंद क्षीरसगर, विनोद घोड़े, सचिन कुटेमाटे, , वासुदेव ठाकरे, अविनाश सिद्धामसेट्टीवार, किशोर बावने, रूपेश ढवस, सुधीर मुड़ेवार, विवेक आकोजवार, वसंत उमरे, सचिन सरपटवार, संग्राम शिंदे, गिरीश पवार, संजय बोरकुटे, महेश सातपुते, राजेश गुंडावर, किशोर पत्तिवार आदी रोटेरियन मंडळी उपस्थित होते.
यावेळी डाॅ.मनीष सिंग आणि नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी रोटरी क्लबचे सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. यावेळी व्यापारी असोसिएशनतर्फे शिंदे मंगल कार्यालयातील कोविड सेंटरला १० बेड उपलब्ध करुन देण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने