विहिरीत पडलेल्या गाईच्या वासराला जीवदान.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पोंभूर्णा तालुक्यातील जुनगाव येथील गावालगत असलेल्या खुल्या विहिरीत पडलेल्या गायीच्या वासराला आज बुधवारी जीवदान मिळाले. अतुल प्रभाकर शेंडे या तरुणाच्या धाडसी प्रयत्नामुळे गाईचे वासरू सुखरूप बाहेर काढले. अतुल प्रभाकर शेंडगे या तरुणाच्या धाडसी प्रयत्नामुळे वासराला बाहेर काढण्यात यश आले.

पोंभूर्णा तालुक्यातील जुनगाव येथील ही घटना आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घनशाम शिवराम पाल यांचे वासरू बुधवारी दुपारच्या सुमारास गावालगत असलेल्या विहिरीत पडल्याची माहिती मिळाली. विहिरीला सुरक्षा कडे नसल्यानेच हे वासरू विहिरीत पडल्याचे दिसून येते. या कारणाने रेस्क्यू पथकालाही बचावकार्य करणे अडचणीचे हाेते. मात्र, अतुल शेंडे याने माेठ्या शिताफीने ऑपरेशन राबविले. दाेराच्या मदतीने अतुल विहिरीत उतरला. व दोराने वासराला बांधून त्याला बाहेर काढण्यात आले. या ऑपरेशनमुळे गायीच्या वासराला सुखरूप बाहेर काढता आले.
विहिरींना सुरक्षा कडे लावा.......

उन्हाळ्याच्या दिवसात माेठ्या संख्येने गुरेढोरे मनमुराद फिरत असतात.
मात्र, बहुतेक शिवारातील व गावाशेजारील विहिरी या जमिनीला समांतर आहेत आणि त्यांना सुरक्षा कडे लावलेले नाहीत. त्यामुळे धावत येणारे प्राणी सहज विहिरीत पडतात. त्यामुळे प्राण्यांचा हकनाक बळी जाताे. शेतकऱ्यांनी अशा समांतर विहिरींना सुरक्षा कडे लावणे गरजेचे आहे, असे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे. रेस्क्यू करणारा अतुल प्रभाकर शेंडे याचे गावकऱ्यांनी कौतुक केले आहे.