Top News

नांदफाटा किव्हा बीबी येथे कोवीड लसीकरण केंद्र सुरू करण्याची भाजपाची मागणी.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत असून देशातील जनता हैराण झाली आहे. शासनाचे सर्वोतोपरी प्रयत्न चालू असून सर्विकडे कोवीड लसीकरण केंद्र चालू केले आहे. कोरपना तालुक्यात कोरपना, गडचांदूर, नारंडा, कावठाळा येथे केंद्र चालू करण्यात आले आहे. परंतु नंदाफाटा येथे 20 हजार लोकसंख्या असून लागूनच एल अँड टि सिमेंट कंपनी आहे. जवळच आवळपुर, बीबी मोठे गाव असून त्या ठिकाणी कोवीड लसीकरण केंद्र नसल्याने तेथील लोकांना गडचांदूर व कावठाळा येथे जाने शक्य नाही.

परिसरातील बहुतेक लोक सिमेंट कँपनीत नौकरी करीत असल्याने त्यांना आपली नोकरी सोडून कोरोना लसीकरण करीता जाऊन लाईन लावावे लागत आहे. जर नांदाफाटा किव्हा बीबी येथे कोविट लसीकरण केंद्र सुरू केल्यास तेथील नागरिकांना साहस भेटू शकते. त्याकरिता नंदाफाटा किव्हा बीबी येथे केंद्र चालू करण्याची मागणी मा. जिल्हाधिकारी यांना तालुका आरोग्य अधिकारी कोरपना यांचे मार्फत भारतीय जनता पार्टी गडचांदूर च्या वतीने जिल्हा सदस्य तथा कोरपना पंचायत समितीचे माजी सभापती संजयभाऊ मुसळे, गडचांदूर शहर अध्यक्ष सतिशजी उपलेंचिवार, भाजपा नेते निलेशजी ताजने, नगरसेवक अरविंद डोहे, माहेश घरोटे यांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने