चंद्रपूर:- चंद्रपूर येथील वैदिशा शेरेकर या अडीच वर्षाच्या चिमुकलीने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड नंतर आता इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये स्थान मिळवले आहे. चंद्रपूर येथील बँक ऑफ इंडिया पद्मापूर शाखेमध्ये असिस्टंट मॅनेजर पदावर कार्यरत वैभव शेरेकर हे मुळचे अकोल्याचे यांची चिरंजीव वैदिशा ही एकुलती एक मुलगी. ती अवघ्या एक वर्षाची असताना पासून तिची आई दिपाली शेरेकर यांच्या लक्षात आले की तिची असाधारण कुशाग्र बुद्धिमत्ता आहे जसे तिला एक गोष्ट सांगितली कि ती तिच्या लक्षात रहायची. तिच्या बुद्धीचा कसा सदुपयोग करता येईल यावर शेरेकर उभयतांनी बराच विचार केला त्यातून त्यांना मार्ग सापडला.
आताशा वैदिशा जवळपास अडीच वर्षाची झाली होती. ठरल्याप्रमाणे तिच्यासाठी सर्व देशांच्या राजधानी व त्या त्या देशांचे राष्ट्रीय ध्वज असलेले चार्ट आणून त्या माध्यमातून तिला शिकवण सुरू केले. तिने अवघ्या पंधरा-वीस दिवसात 200 पेक्षा अधिक देशांच्या राजधानी तसेच त्यांचे राष्ट्रीय ध्वज अचूकपणे सांगण्या इतपत तयारी केली.
तिच्या या दैदिप्यमान कामगिरीची दखल जानेवारी महिन्यातच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने घेतली होती. आता इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने तिचे इतक्या लहान वयात केलेल्या असाधारण कामगिरीस पाहून तिचे नाव इंटरनॅशनल बुक रेकॉर्ड मध्ये नोंदवून तिचा जागतीक स्तरावर गौरव केला आहे. सध्या चिरंजीव वैदिशा ही तिचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे धेय लवकरच गाठेल यात तीळमाञ शंका नाही त्याच अनुशंगाने ती कसुन सराव करत आहे.
इतक्या इवल्याशा वयात असे दोन प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त करणे ही खूप अभिमानास्पद गोष्ट असल्यामुळे वैदिशावर सगळीकडुन कौतुकाचा वर्षाव होत आहे. भविष्यातील तिच्या कामगिरीसाठी शुभेच्छा…