प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यासाठी भाजपा पदाधिकारी चढला झाडावर.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील कर्नाटका एम्टा कोळसा खाण पुन्हा सुरू होऊन चार महिन्यांच्या कालावधी लोटला तरी प्रकल्प ग्रस्तांना न्याय न मिळाल्याने अखेर भाजपा पदाधिकार्यांने तहसील कार्यालयातील झाडावर चढून आंदोलन केले.

भद्रावती शहरापासून जवळच असलेल्या कर्नाटका एम्टा कोळसा खाणित बरांज येथील शेतकर्यांचा जमिनी गेल्या हि खदान बरेच दिवस पर्यंत बंद होती. अगदी अलिकडेच चार महिन्यापूर्वीच सुरू झाली. परंतु प्रकल्प ग्रस्तांना प्रति सातबारा 5 लाख रूपये व 180 जुन्या कामगारांना नियुक्ती पञे देण्यात आली नाही. या दोन प्रमुख मागण्या सह इतर मागण्यांना घेवुन भद्रावती तालुका भाजपाचे महामंञी नरेंद्र जिवतोडे हे दि.17 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता च्या दरम्यान येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेश द्वारा जवळील उंच झाडावर चढले. यावेळी त्यांचा गळ्यात गळफास व सोबत पेट्रोलची बाॅटल आणि माचीस होती. जर मागण्या मान्य झाल्या नाही तर गळफास किंवा आत्मदहन करू असा ईशारा प्रशासनाला त्यांनी दिला होता. यावेळी कोळसा खाण परिसरात भद्रावती पंचायत समिती चे सभापती तथा प्रकल्पग्रस्त प्रविन ठेंगणे , बरांज ग्राम पंचायतिचा सरपंच मनिषा ठेंगणे आणि ईतर प्रकल्प ग्रस्त यांनी कोळसा खाण काम बंद पाडले. हि बाब आमदार सुधिर मुनगंटीवर यांना माहिती होतच ते येथील तहसील कार्यालयात उपस्थित झाले. व त्यांनी जिवतोडे यांना खाली उतरण्याचे आवाहन करून मागण्या पुर्ण करण्याचे आश्वासन दिले. यानंतर तहसीलदार महेश शितोडे, कर्नाटक एम्टा कंपनीचे अधिकारी राजेश वासाडे यांचा सोबत चर्चा करून जुन्या कामगारांना नियुक्ती पञ त्वरीत देण्याच्या सुचना दिल्या यावेळी आमदार सुधिर मनगंटिवार यांनी उच्च स्तरीय बैठक लावून सर्व प्रकल्प ग्रस्तांचा समस्या सोडवून घेवु असे आश्वासन दिले. यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने