Top News

भद्रावती शहरात आग लागून दोन दुकाने भस्मसात.

साडेसहा लाखाचे नुकसान.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती शहरातील मुख्य बाजारपेठेत मंगळवार दि.13 ला पहाटे 3 ते 4 वाजताच्या दरम्यान लागलेल्या आगीत दोन दुकाने भस्मसात होऊन जवळपास साडेसहा लक्ष रुपयाचे नुकसान झाल्याची घटना घडली.
    पहाटे 6 वाजता अग्निशमक दलाची गाडी घटनास्थळी पोहचली मात्र तोपर्यंत उपस्थित नागरिकांनी आग विझवली होती.या आगीत संजय वसंत बेलगावकर यांच्या वसंत आयुर्वेदिक मेडीकल स्टोअर्स ला आग लागून दुकानातील सर्व मालासह आवश्यक दस्तऐवज दुकान परवाना जळून खाक झाला.यात त्यांचे जवळपास तीन लाखाचे नुकसान झाले. तर बाजूलाच असलेल्या मंगेश संजय सहारे यांच्या सहारे पूजा साहित्ये भांडाराला आग लागून दुकानातील सर्व माल जळाला यात त्यांचे जवळपास अडीच लाखाचे नुकसान झाले. घटनेची तक्रार दोन्ही दुकान मालकांनी भद्रावती पोलीस स्टेशन ला दिली. पोलिसांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी करून पंचनामा केला. या घटनेचा अधिक तपास भद्रावती पोलीस करीत आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने