Top News

दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलल्या.


Bhairav Diwase.     April 12, 2021
व्हिडिओ पहा......
👇👇👇👇👇👇👇

मुंबई:- दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे. गायकवाड यांच्याशी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सोमवारी चर्चा केली. या चर्चेनंतर हा निर्णय घोषित करण्यात आला आहे.
वर्षा गायकवाड यांनी ट्विटद्वारे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले आहे. सध्याची परिस्थिती ही परीक्षा घेण्यासाठी योग्य नसल्याचे म्हणत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. विद्यार्थींचे आरोग्य हे महाविकास आघाडी सरकारसाठी प्राधान्याची गोष्ट असल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी जाहीर केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने