Top News

रक्ताचा तुडवडा लक्ष्यात घेता गोंडपिपरी येथे रक्तदान शिबिर संपन्न.

51 रक्तदात्यांनी केले रक्तदान.

समाजकार्य महाविद्यालय चंद्रपूर व चिंतामणी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा पुढाकार.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गोंडपिपरी:- सुशीलाबाई रामचंद्र मामीडवार समाजकार्य महाविद्यालय पडोली चंद्रपूर व चिंतामणी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स गोंडपीपरी यांच्या संयुक्त विद्यमाने 
राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक 11 एप्रिल रोज रविवारला स्व. लक्ष्मणराव कुंदोजवार कनिष्ठ महाविद्यालय गोंडपिपरी येथे रक्ताचा तुडवडा लक्ष्यात घेता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले. 

      महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ व हार अर्पण करून रक्तदानाच्या शिबिराला सुरुवात करण्यात आली. आयोजकांच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रमुख उपस्थिती मा. संदीप धोबे ठाणेदार गोंडपिपरी, मा. महेंद्रसिंग चंदेल संस्थापक अध्यक्ष गोंडपिपरी शहर विकास आघाडी, सूरज भाऊ माडूरवार संस्थापक अध्यक्ष गोंडपिपरी यंग ब्रिगेड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. रक्तदान शिबिरात सहभाग घेतलेल्या रक्तदात्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते शाल, श्रीफळ  व प्रमाणपत्र देउन सत्कार करण्यात आला. गोंडपीपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मा. संदीप धोबे साहेबानी सुद्धा रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केले हे विशेष!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने