एप्रिल फुल संबंधित मेसेज व्हायरल करत आहात तर, हि बातमी नक्की वाचा.


Bhairav Diwase. April 01, 2021
१ एप्रिलला अनेक जण आपल्या परिचितांना एप्रिल फुल करण्याचा प्रयत्न करीत असतात. पण, यंदा कोरोना विषाणूचे संकट जगावर आले आहे. अशा परिस्थितीत लोकांमध्ये संभ्रम निर्माण केलेले मेसेज एप्रिल फुल म्हणून टाकू नये, नाहीतर त्यांच्या गुन्हे दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर अनेक कोरोना विषाणू संबंधित खोटी माहिती पसरवली जात आहे. कुणीही कोरोना विषाणू संबंधित एप्रिल फूल चे मेसेज सेंड करु नये.

निखळ आनंद म्हणून एक एप्रिलला लोकांना फुल बनविण्याची आपल्याकडे पद्धत आहे. त्यामुळे कोणाचे नुकसान व्हावे, असा त्यामागे हेतू नसतो. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे 1 एप्रिलला कोरोना विषाणू यासंदर्भात कोणत्याही प्रकारचे संभ्रम निर्माण करतील असे मेसेज टाकू नये, सोशल मीडियावर व्हायरल करू नये.

प्रशासनावर ताण निर्माण होणार नाही. याकडे लक्ष द्यावे़ जर अशा स्वरुपाचे मेसेज आपल्याकडून सोशल मिडियावर व्हायरल होऊ नये. दरम्यान, 1 एप्रिल हा दिवस एप्रिल फूल म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. यादिवशी प्रत्येकजण आपल्या मित्र-मैत्रिणिला खोटे मेसेज पाठवणूक फसवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे यंदा एप्रिल फूलमध्ये कोरोना विषाणूं संबंधित चुकीचे मेसेज सेंड केल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे.

सध्या सोशल मीडियावर आज एक मेसेज व्हायरल होत आहे. त्या मध्ये "महाराष्ट्रात लॉकडाऊन उद्या पासून होणार" असा मजकूर लिहून त्याच्या सोबत एक PDF file जोडली आहे. अशा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेज वर विश्वास ठेवू नये. आपल्याकडे अश्याप्रकारे मेसेज येत असेल तर कोणालाही फारवर्ड करु नये.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने