मदर डेअरीकडून दुध उत्पादकांची लुट.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील पिपरी(दे.) येथील मदर डेअरी कडून दुध उत्पादक शेतक-यांची लुट होत असून ती त्वरीत थांबविण्यात यावी अशी मागणी दुध उत्पादक शेतक-यांनी केली आहे. 

            पिपरी येथील मदर डेअरीच्या   दुध संकलन केंद्रावर मागील चार वर्षापासून फॅट मशीन नादुरुस्त आहे.दुध मोजण्याचा काटासुद्धा नाही. ही मशीनरी नसल्यामुळे शेतक-यांच्या दुधाला स्वमर्जीने भाव दिला जातो. याबाबत गावातील दुध उत्पादक शेतक-यांनी डेअरीच्या चंद्रपूर येथील कार्यालयात जाऊन आपली कैफीयत मांडली असता तेथील अधिकारी शुक्ला यांनी अमरावती येथील अधिका-याशी बोलणे केले. यावेळी उडवा-उडवीची उत्तरे देण्यात आली. तसेच संकलन केंद्र बंद करण्याची धमकी देण्यात आली. प्रशासनाने या बाबीची दखल घेऊन शेतक-यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी पिपरी येथील शेतकरी गंगाधर बोबडे, शिरीष जेनेकर, सचिन कुटेमाटे, सुधाकर पाटील, योगेश मत्ते, विनायक कुटेमाटे, सुभाष भोयर, संदीप काकडे यांनी केली आहे.