Click Here...👇👇👇

सख्या भावानेच केली भावाची हत्या.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात 
आरमोरी:- आरमोरी पोलीस स्टेशन हद्दीतील शेगावटोली मध्ये गणेश ताताजी नैताम (२८ वर्ष) व त्याचा लहान भाऊ विकेश ताताजी नैताम (२६) हे सोबत राहत होते. दिनांक ३ एप्रिल ला रात्री १० वाजता गणेश आणि विकेश यांच्यात भांडण झाले. सदर भांडणाचा राग डोक्यात ठेवून विकेश याने पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान गणेश झोपला असताना, त्याच्या डोक्यावर, छातीवर कुऱ्हाडीचे वार करून हत्या केली. यात त्याचा मृत्यू झाला. मृत पावलेल्या इसमाचे नाव गणेश ताताजी नैताम असे आहे.

या प्रकरणी आरमोरी पोलीस स्टेशन येथे आरोपी विकेश नैताम याचे विरुद्ध भा.दं.वि. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, आरोपीस अटक करण्यात आले आहे, अधिक तपास सपोनि पंकज बोण्डसे हे करीत आहेत.