राजुरा ठाण्यात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल असलेल्या जी. पूलय्या यांना तात्काळ अटक करा.

Bhairav Diwase
भारतीय मानवाधिकार असोसिएशनने केली मागणी



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे
राजुरा:- वेकोली प्रकल्पग्रस्त आशा घटे या युवतीच्या आत्महत्या प्रकारात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल असलेल्या जी.पुलय्या यांना अद्यापही अटक झालेली नाही त्यांना तात्काळ अटक करावी आशा आशयाचे निवेदन भारतीय मानवाधिकार असोसिएशनने राजुरा पोलीस निरीक्षक यांना दिले आहे.

      वेकोली प्रकल्पग्रस्त आशा घटे या युवतीने  काही दिवसांपूर्वी वेकोली अधिकाऱ्यांच्या  मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आशा घटे आत्महत्या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल असलेल्या वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रातील मुख्य प्रबंधक कार्यालयातील नियोजन अधिकारी जी पुलय्या या अजूनपर्यंत अटक झाली नाही तरी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पुलय्या यांना दिरंगाई न लावता तात्काळ अटक करावी अशी मागणी भारतीय मानवाधिकार असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष बंडू मडावी, जिल्हाध्यक्ष मनोज आत्राम, सचिव रमेश आडे, संघटक निळकंठ साळवे आदींनी केली आहे.