प्रवासी निवारा मध्ये एका इसमाचा उपचाराअभावी दुर्देवी मृत्यू.

Bhairav Diwase
0

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
ब्रम्हपुरी:- संपूर्ण  देशामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला असून ब्रम्हपुरी येथील रुग्णालयामध्ये कोरोनाच्या रुग्णाला भरती करण्यासाठी बेड व इतर सामुग्रीचा अत्यंत तुटवडा भासत आहे. त्यातच ब्रह्मपुरी शहरातील ख्रिस्तानंद चौक येथील प्रवासी निवारा मध्ये एका इसमाचा उपचाराअभावी दुर्देवी मृत्यू झाल्याची खळबळजणक घटना घडली आहे.  

    मृतक इसम हा उपचारासाठी ब्रम्हपुरी येथे आला असता रूग्णालयात भरती होण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. सदर मृतक इसम हा नातवाईका सोबत ब्रम्हपुरीला भिवापूर तालुक्यामधून आंभोरा गावामधून आला होता. असे बोलले जात आहे.
    
 सदर वृत्त लिहेपर्यत  मृतक इसमाच नाव अध्यापही कळू शकले नाही.  हि घटना फार दुर्दैवी असून चंद्रपूर जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारणारे पालकमंत्री तथा ब्रम्हपुरीचे आमदार यांचे लक्ष्य आहे काय? असा प्रश्न जनतेकडून उपस्थित केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)