Top News

मुलची "आरती" रोमॅंटिक कोळी गीताच्या अल्बममध्ये झळकली!


Bhairav Diwase. April 18, 2021
मुल:- मुल शहरातील सामान्य कुटुंबातील आरती ईश्वर चिताडे हिने मराठी रोमॅंटिक कोळी गिताच्या अल्बममध्ये मुख्य अभिनेत्रीची भुमिका साकारली आहे. या मराठी रोमॅंटिक कोळी गिताला रसिकांनी डोक्यावर घेतले असून, अल्पावधीतच रसिकांच्या मनाचा ठाव घेतला आहे.

व्हिडिओ सॉंग पाहण्यासाठी क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇
मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रसिकांना फुलणारी "लय पेशल प्रेमळ कहाणी" या मराठी रोमँटिक कोळी गीताने केली. हे गीत १३ एप्रिल 2021 रोजी सर्व मराठी गाण्याच्या वाहिन्यांवर प्रसारित करण्यात आले होते. त्याच प्रमाणे हे गीत सर्व ऑनलाइन म्युझिक ॲप आणि युट्युबवर देखील प्रसारित करण्यात आले. या गीताचे संपूर्ण चित्रीकरण रत्नागिरी जिल्हातील आंबवळी व मंडणगडच्या नयनरम्य ठिकाणी करण्यात आले आहे.

या गाण्याची निर्मिती किशोर लाड व अमित मिरचंदानी यांनी केली. दिग्दर्शन/संकलनाची बाजू सक्षमपणे रविंद्र सरोवर यांनी पार पाडली. हे गीत शिरीष वाघमारे यांनी लिहिले असून, गायक असित सकपात आणि आम्रपाली पांचाळ यांनी गाण्याला आवाज दिला आहे. कार्यकारी निर्माता म्हणून सूरज पाटील यांनी जबाबदारी पार पाडली. गाण्यात मुख्य भूमिका अभिनेता आकाश जोगी आणि अभिनेत्री आरती चिताडे यांनी साकारली आहे.

या दोघांच्या अभिनयाची उत्तम सांगड ही रसिकांचे मनमोहित करते व सुखद अनुभूती देते. एकंदरीत हे रोमॅटिक कोळी गीत अगदीच सुंदर आणि गोड अशी प्रेमाची अलगद कहाणी फुलताना बघून रसिकांना आपसूकच भुरळ पडणार आहे, ऐवढे मात्र नक्की!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने