कत्तलीसाठी जनावरे नेणारा ट्रक पकडला.

(संग्रहित छायाचित्र)

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
सिरोंचा:- छत्तीसगड राज्यातील सीजी ०४ जेबी ०१२६ क्रमांकाच्या ट्रकने जनावरे तेलंगणा राज्यात नेले जात असल्याची गोपनीय माहिती पेंटीपाका गावातील नागरिकांना मिळाली. युवकांनी सापळा रूचून वाहन आसरअल्ली, रंगधमपेठा व अंकिसा येथे थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रकचालकाने वाहन थांबविले नाही. ही वार्ता संपूर्ण सिराेंचा तालुक्यात पसरली. ट्रकला अडविण्यासाठी पेंटीपाका चेक येथे ट्रॅक्टरचे केसव्हील रस्त्यावर ठेवण्यात आले. यालाही न जुमानता ट्रकचालकाने केसव्हीलवरून ट्रक नेला. ५०० मीटरपर्यंत केसव्हील फरफटत नेले. मात्र, भरधाव वेगातील ट्रकचे एक्सल तुटून ट्रक अनियंत्रित हाेण्यास सुरुवात झाली. ही बाब चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने गावाच्या हद्दीच्या बाहेर ट्रक साेडून वाहकासह पसार झाला.
पाेलिसांनी ट्रकचालक व मालकाविराेधात गुन्हा दाखल केला आहे. ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे.

परंतु, वाहनचालकाने अतिवेगाने ट्रक समोर नेले. अखेर पेंटींपका इथे रस्त्यावर ट्रॅक्टरचे केजी व्हील आडवे ठेवून रस्ता बंद करून तस्करी करणाऱ्या ट्रकला पकडण्याचा प्रयत्न स्थानिक सामाजिक कार्यकर्ते किरण वेमुला व गावकऱ्यांच्या सहकार्याने केला. यात ५२ पैकी १३ गायी मृत अवस्थेत आढळल्या. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून ट्रक जप्त केला. पुढील चौकशी पोलीस निरीक्षक अजय अहिरकर यांचा मार्गदर्शनाखाली उप पो. नि. एस. कांदे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या