माजरी पोलिसांचे मात्र दुर्लक्ष?
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- देऊरवाडा माजरी रस्त्यावर शेतशिवारात गेल्या कित्येक दिवसापासून जुगार भरत असुन या प्रकाराकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात जुगार खेळणाऱ्याचा मेला भरत असल्याची माहिती समोर आली आहे.
भद्रावती देऊरवाडा माजरी या मार्गावरील माजरी रेल्वे पासून अर्धा किमी अंतरावर शेतशिवारात बावन तास पत्त्यावर पैशाची बाजी लावून जुगार खेळला जातो. दररोज येथे लाखोची बाजी लागत असल्याची माहिती जाणकारांनी दिली. तसेच या परिसरात जुगार खेळणाऱ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात . त्यामुळे येथे मोठया प्रमाणात जुगार खेळणाऱ्यांची गर्दी असते. या ठिकाणी चंद्रपुर, भद्रावती, हिंगणघाट, घुग्घुस, माजरी इतर अशा कोणत्याही ठिकानावरून ते जुगार शोकिण येतात. तसेच सध्या कोरोनाचा काळ असुन कोणत्याही प्रकाराची भीती न बाळगता जुगारी जुगार खेळत आहे. माजरी पोलिसांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याने जुगार भरविणाऱ्यांची चांगलीच हिम्मत वाढली आहे. पोलिसांनी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सुध्दा नागरिकांनी केली आहे.