अत्यंत दुःखद बातमी.....
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
वरोरा:- पत्रकार ते खाजगी नोकरदार अश्या विविध क्षेत्रात आपल्या कामगिरीचा ठसा उमटविनारा वरोरा शहराचा "धोनी" आज आपल्यातून निघून गेला. अवध्या 30 वर्ष वय असलेला धोनी उर्फ विनोद चिकाटे वरोरा शहरात आपल्या आई-वडील, भाऊ व बहिणीसोबत राहत होता, घरचा मोठा मुलगा असल्याने घरच्यांसाठी कोणतेही काम करण्याची तयारी दर्शविणारा धोनी, वरोऱ्यातील स्थानिक वृत्त वाहिनीत काम करीत होता.
अनेक वर्षे त्याने स्वतंत्र पत्रकार म्हणून स्वतःची चांगली ओळख निर्माण केली. पुढे चालून त्याने वरोरा शहरातील नामवंत खाजगी हॉस्पिटलमध्ये काम केले. कोरोना सारख्या भयावह काळात सुद्धा त्याने अनेकांची मदत केली. हॉस्पिटलमध्ये काम करीत असताना कोविड योद्धा म्हणून त्याने कोविड लस सुद्धा घेतली होती. घरची जबाबदारी पार पाडत विनोदने कधीही कोणत्या कामाला नकार दिला नाही. तो नेहमीच तत्पर असायचा. घरी काम असल्याने विनोदने 2 दिवसांची सुट्टी घेतली मात्र या कालावधीत तो कोरोनाने ग्रासला. त्याची तब्येत अचानक खालावल्याने चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात 3 एप्रिलला सकाळी 10 वाजता दाखल करण्यात आले होते. मात्र रात्री 10 वाजेदरम्यान त्याचा मृत्यू झाला. विनोदची यावेळी कोविड चाचणी करण्यात आली त्यामध्ये त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. व वरोरा शहरातील धोनी उर्फ सोनू आपल्यातून निघून गेला. विनोदच्या अचानक जाण्याने वरोरा शहरात दुःखाचे वातावरण पसरले आहे.
विनोद चिकाटे यांना वरोरा शहरात, परिसरात व मित्र परिवारत सोनु उर्फ धोनी या नावाने ओळखले जात होते. ते टॉम न्युज चे वरोरा तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. तसेच महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे सदस्य तथा छायाचित्रकार, सिटी न्युज चे कॅमेरामन अशाप्रकारे पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असतांनाच फोटोग्राफीचा छंद जोपासणारे, सामाजिक चळवळीत नेहमीच अग्रेसर असणारे, मनमिळाऊ अष्टपैलू व्यक्तीमत्वाचे धनी, सर्वांचे आवडते, सामाजिक बांधिलकी सतत जोपासणारे सोनु उर्फ धोनी यांचेवर काळाने झडप घातली. त्यांचे निधनाने पत्रकारितेच्या क्षेत्रात व वरोरा शहरात फार मोठी पोकळी निर्माण झाली असून ती कदापिही भरून न निघणारी आहे. आधार न्यूज नेटवर्क टिमतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐