आ. सुधीर मुनगंटीवार यांनी धरले प्रशासनास धारेवर.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
चंद्रपूर:- सास्ती येथिल 19 वर्षीय प्रकल्पग्रस्त युवती आशा घटे आत्महत्या प्रकरणात राजुरा पोलिसांनी अखेर कारवाई करत वेकोलि क्षेत्रीय नियोजन अधिकारी जी.पूल्लया यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भादंवी कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 31 मार्च 2021 रोजी घडलेल्या ह्या प्रकरणात संपुर्ण चौकशी करून पोलिसांनी 3 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी सात वाजताचे सुमारास कारवाई केली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
सास्ती येथील आशा तुळशिराम घटे यांच्या वडीलाची शेती वे.को.ली. मार्फत संपादीत करण्यात आली होती. त्या अनुषंगाने आशा घटे ही वेकोली मार्फत लाभार्थी असल्यामुळे नोकरी संदर्भातील कागदपत्राची पूर्तता करण्याकरिता वेकोलिचे क्षेत्रीय योजना अधिकारी जी पुलया यांनी, धोपटाळा येथील वेकोली कार्यालयात दि. २२ मार्च २०२१ रोजी नौकरीसाठीचे सर्व दस्ताऐवज घेवून कुटूंबीयासोबत बोलविले होते.
यावेळी तिचे वडील व आजोबा यांनी संमतीपत्राद्वारे आपल्या मुलीला नौकरी देण्याचे करारनामा दिला होता. परंतु या नियोजन अधिकाऱ्यांनी आशा हिला तिच्या संपूर्ण परिवारा समोर अपमानित करत अपशब्द वापरले त्रास दिला असे तिच्या वडिलांचे म्हणणे आहे.
आपला कुटुंबीयांना समोर झालेला अपमान करून नोकरी देण्यास वारंवार वेकोली अधिकारी त्रास देत असल्याने तिने घरी येऊन विष प्राशन केले. आशा ची प्रकृती खराब झाल्याने त्यांनी सास्ती येथील खाजगी रूग्णालयात औषधोपचार केले. आणखी प्रकृती बिघडत गेल्याने दिनांक २७ मार्च ला चंद्रपुर येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले. दरम्यान परिस्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे ३१ मार्च ला चंद्रपुर जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला.
आशा घट्ट मूर्त प्रकरणात क्षेत्रीय नियोजन अधिकार्यावर कारवाई करण्याची मागणी तिच्या कुटुंबियांनी केली होती. सर्वप्रथम पोलिसांनी गुन्हा तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केली त्यानंतर या प्रकरणाचा तपास करीत क्षेत्रीय नियोजन अधिकारी जी.पूल्लया विरूद्ध गुन्ह्य दाखल केला आहे.
शेवटी पत्रकारांना आपली आपबिती सांगून मृतकाच्या नातेवाइकांनी आपले मुळगाव साखरी येथे आशावर अंत्यसंस्कार केले. दुसऱ्या दिवशी राजुरा तेली समाजाने स्वर्गीय आशा घटे ला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेऊन अनेकांना निवेदन देऊन त्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली.
जवळपास दोन तीन दिवस तिचे कुटुंबिय त्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी यासाठी प्रयत्न करीत होते. परंतु, यश मिळत नसल्याचे लक्षात येता राजुरा येथील तेली समाजाचे एक शिष्टमंडळ माजी पालकमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांची मार्गदर्शक बादल बेले व युवा जिल्हाध्यक्ष सचिन शेंडे यांच्या सहित तुळशीरामजी घटे व नातेवाईकानीं भेट घेत काल सायंकाळी आपली आपबिती सांगितली असता. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विषयाचे गांभीर्य ध्यानात घेत तात्काळ जिल्हा प्रशासन व वेकोलि प्रशासनास चांगलेच धारेवर धरले असता, राजुरा पोलीस ठाण्यात क्षेत्रीय नियोजन अधिकार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच त्याला अटक होण्याची शक्यता आहे.
जवळपास तीन दिवसापासून तगादा लावूनही त्या अधिकाऱ्यावर तक्रार दाखल होत नसल्याने कुटुंबियांना घोर निराशा झाली होती मात्र उशीरा का होईना पण काल त्या वेकोली च्या अधिकाऱ्यावर भादवी कलम ३०६ अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याबद्दल सर्व पत्रकार बांधव, तेली समाजबांधव ,राजकीय पुढारी ज्यांनी ज्यांनी आशा ला न्याय मिळविन्याकरीता सहकार्य केले त्या सर्वांचे बद्दल तिच्या कुटुंबियांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.