शब्दांकूर फाऊंडेशनतर्फे घेतलेल्या विविध स्पर्धेचा निकाल जाहीर.

Bhairav Diwase
मा.सुधाकर अडबाले यांच्या सौजन्याने विजयी स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरव.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- शब्दांकूर फाऊंडेशन मार्फत मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.मराठी भाषेचे संवर्धन होण्यासाठी व मायबोलीचा बोलण्यात अधिक वापर करण्यात यावा यासाठी पोस्टर स्पर्धा,निबंध स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धा प्राथमिक गट (वर्ग४ ते ७) व माध्यमिक गट (वर्ग ८ ते १२) या दोन गटात घेण्यात आली.
    
        पोस्टर स्पर्धेमध्ये गौरव मराठीचा या विषयांतर्गत प्राथमिक गटात प्रथम क्रमांक दुर्गा आनंदराव भोयर,चक बेरडी,द्वितीय क्रमांक लक्ष्मी पुणेचंद येलमुले,चक बेरडी,तृतीय क्रमांक श्रेया सुधीर सहारे,भंगाराम तळोधी तर माध्यमिक विभागात प्रथम क्रमांक मीनल चिकनकर,चंद्रपूर द्वितीय क्रमांक प्रदक्षणा विनय चांदोरे,गोंडपीपरी तृतीय क्रमांक अंजली घनश्याम सोरते यांनी क्रमांक पटकाविले आहे.पोस्टर स्पर्धेचे परीक्षण तानाजी अल्लीवार सर यांनी केले.निबंध स्पर्धेचे प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक बुद्धश्री सुनील उराडे, चेक पारगाव,द्वितीय क्रमांक लीना दानपाल चौधरी,पाथरी तर तृतीय क्रमांक सोनाली रामदास घुबडे,सकमुर आणि माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक मीनल प्रेमदास चिकनकर,चंद्रपूर,द्वितीय क्रमांक संजीवी प्रेमदास मलोडे, ब्रम्हपुरी तर तृतीय क्रमांक तन्वी वसंत गाडगे,चंद्रपूर यांनी क्रमांक पटकाविला.या स्पर्धेचे परीक्षण राजेश्वर अम्मावार सर यांनी केले आहे.
          प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक हिमांशू रवींद्र बोडावार,तोहोगाव, द्वितीय क्रमांक चैताली बाबा ढवस,तोहोगाव,तृतीय क्रमांक अथर्व सुदर्शन भोगेकर, गोंडपीपरी तर माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक नक्षत्र कायरकर,चंद्रपूर,द्वितीय क्रमांक प्रणव सुदर्शन भोगेकर गोंडपीपरी,तृतीय क्रमांक प्रदक्षणा विनय चांदोरे गोंडपीपरी यांनी क्रमांक पटकाविले आहे.या स्पर्धेचे परीक्षण किशोर चलाख सर यांनी केले आहे.तिन्ही स्पर्धेत क्रमांक पटकविलेल्या स्पर्धकांना मा.सुधाकर अडबाले सर सरकार्यवाहक विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ यांच्या सौजन्याने सन्मानचिन्ह व गौरवपत्र देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कार्यक्रम आयोजित न करता सन्मानचिन्ह व गौरवपत्र घरपोच पोहचविण्यात येणार आहे.
           तसेच इतर सहभागी स्पर्धकांना इ-गौरवपत्र देण्यात येणार आहे.शब्दांकूर फाऊंडेशन,चंद्रपूर विविध स्पर्धेच्या आयोजन करण्यासाठी दुशांत निमकर,राजेश्वर अम्मावार,किशोर चलाख,तानाजी अल्लीवार,प्रा.ललिता वसाके, राकेश शेंडे,प्रशांत खुसपुरे,मनोहर आंबोरकर,सुनील सातपुते,सौ उषा निमकर,आशिष ढवस या सर्वांचे सहकार्य लाभले.