लग्न समारंभात घुसून नक्षल्यांनी केली माजी उपसरपंचाची हत्या.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
एटापल्ली:- गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील बुर्गी येथे माजी उपसरपंच तथा आदिवासी विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते रामा तलांडी (३७) यांची शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास नक्षल्यांनी गोळी झाडून हत्या केली. अचानक करण्यात आलेल्या गोळीबारात तलांडी यांचा जागीच मृत्यू झाला.
मृतक रामा तलांडी हे बुर्गी ग्रामपंचायतमध्ये १० वर्ष उपसरपंच होते. बुर्गी येथे लग्न समारंभ होता. तिथे डीजे लावत असताना साध्या वेशात नक्षलवादी आले आणि त्यांनी रामा तलांडी यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. गोळ्या झाडल्यानंतर नक्षली जंगलात पसार झाले. तर गोळ्या लागून गंभीर जखमी झालेल्या रामा तलांडी यांचा जागेवरच मृत्यू झाला.