(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- जाम खुर्द येथील शेतालगत जंगलातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पोंभुर्णा तालुक्यातील जाम येथे काल (दि. 09) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. मुर्लिधर शिंदे वय ६० वर्षे असे मृतकाचे नाव असून तो जाम तुकुम येथील रहिवासी आहे. कामावर तो मजुर म्हणून जात होता यात (दि. 08) तो कामावर जातो म्हणून निघाला पण रात्रो घरी परत आला नसल्याने त्याची शोधाशोध केली असता तो मिळाला नाही. तर काल पुन्हा शोधले असता तो शेतालगत जंगलाच्या रस्त्याच्या कडेला एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसुन आला. याची माहिती पोंभुर्णा पोलिस स्टेशनमध्ये देण्यात आली. पोंभुर्णा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले. पुढिल तपास पोंभुर्णा ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार सुरेश बोरकुटे, संतोष येंनगंदेवार हे करीत आहेत.