डिझेलच्या अभावी राजुरा आगाराचे अनेक बसफेऱ्या रद्द.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) राहुल थोरात
राजुरा:- राजुरा येथील एसटी महामंडळाच्या राजुरा आगाराचे डिझेल संपल्यामुळे अनेक मार्गावरील बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. वेळेचा घडीला प्रवाशांना घरी पोहचता आले नाही परंतु उशिरा का होईना प्रवाशांना व  शाळकरी मुलांना परत घरी पाठविण्याकरिता मात्र आज महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. शिल्लक असलेले डिझेल व बसफेऱ्या पूर्ण करून आलेल्या बसेसच्या टंकीमधून डिझेल काढून अतिदुर्गम नगरळा, जिवती, पुडियाल मोहदा, धिडशी व अन्य काही गावातील विद्यार्थ्यांना घरी पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली. डिझेलअभावी बसफेऱ्या रद्द झाल्यामुळे प्रवांश्यासह एसटी महामंडळालाही फटका बसला आहे. अशी नामुष्की का उद्धभवली यावर एसटी महामंडळाने गंभीरपूर्वक विचार करून योग्य नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे जेणेकरून यानंतर अशाप्रकारचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागणार नाही.