Top News

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून रा.काँ.पा. तर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन.

नवनियुक्त PSI वर्षा तांदूळकर यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:-राष्ट्रवादी कांग्रेस पार्टिचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार साहेब यांचे आव्हान तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत दादा पाटिल साहेब,जिल्हाध्यक्ष राजेन्द्र जी वैद्य यांच्या सूचनेनुसार आज रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.
महाराष्ट्रात रक्ताच्या साठ्यात तुटवडा निर्माण झाला असून राजुरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजुरा च्या वतीने महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन आज राजुरा येथील लक्ष्मी समाज भवन पेठ वार्ड येथे करण्यात आले.


यावेळी या रक्तदान शिबिराचे उद्घाटन राजुरा च्या नवनियुक्त पी एस आय. वर्षा तांदूळकर यांच्या हस्ते करण्यात आले. व महामानव डॉ बाबासाहेब आबेडकरांच्या प्रतिमेला हार टाकून माल्यार्पन करण्यात आले.
राज्यात सध्या कोरोना महामारी सुरू असताना रक्ताचा पुरवठा अपुरा पडत असताना अश्या कठीण परिस्थिती मध्ये आज असंख्य मित्रमंडळीनी रक्तदान केले असून त्या सर्व रक्तदात्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राजुरा तर्फे आभार मानण्यात आले.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजुरा तालुकाध्यक्ष श्री. संतोषभाऊ देरकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे राजुरा तालुकाध्यक्ष श्री. आसिफभाऊ सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजुरा शहर अध्यक्ष श्री. रखिबभाई शेख, महिला शहर अध्यक्षा सौ. अर्चना ताई ददगाड, युवक शहर अध्यक्ष श्री. स्वप्नील बाजुजवार, युवक तालुका उपाध्यक्ष श्री. सुजित कावळे, अंकुश भोंगळे, प्रसाद देशमुख, संदीप पोगला, जगदीश साटोने, राजू ददगाड, राहुल वनकर, तथा भास्कर करमनकर सर उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने