राजुरा पोलिस व वन विभाग बनले मुकदर्शन.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- इंदिरा नगर परिसरातील जवळ असलेल्या जोगापूर जंगलात खुलेआम जुगार खेळणे सुरू आहे. दररोज लाखो रुपयांचे जुगार चालत असून पोलीस व वन विभाग मुकदर्शक भूमिका बजावत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.तसेच भर दिवसात बफर झोन मध्ये जुगार खेळत असल्याने हिंसक प्राण्याच्या हल्याचे घटना नाकारु शकत नाही.
सध्या राजुरा तालुका अवैध धंद्याचे माहेरघर बनले आहे.खुलेआम दारू विक्री, कोळसा चोरी, जुगार,रेती चोरी असे असंख्य अवैध व्यवसायाने धुमाकुळ घातला आहे. सध्या राजुरा शहरातील इंदिरा नगर वार्ड लगत जोगापूर जंगल आहे. शहरातील बाहेरील गावातील जुगार खेळण्यासाठी या परिसरात येत असल्याची चर्चा आहे. दररोज लाखो रुपयांचे जुगार खेळत असल्याने बाहेरील गावातील असंख्य युवक वर्ग आपल्या महेनातीचे कमाई या जुगार खेळात घालत आहे.तसेच रात्री बेरात्री असंख्य बाईक स्वार इंदिरा नगर वॉर्डातून जात असल्याने नागरिकांनी यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे विशेष करून महिलांना बाहेर पडणे मुश्किल झाले आहे.
हा जुगार जोगापूर जंगल मध्ये सुरू असून जंगलातील हिंसक प्राण्याच्या हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच जुगार खेळत असताना दारू पार्टी व चिकन पार्टी होत असून जंगलात या पार्टी मुळे जंगलाला आग लागण्याची शक्यता खूप जास्त असते.हा सर्व प्रकार वन विभागाच्या अधिकाऱ्याला माहिती असून देखील सर्व अधिकारी वर्ग मूग गिळून गप्प बसले आहे अशी ओरड सुरू आहे. पोलिस विभागणी या अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकून कारवाही करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी करत आहेत.