नारंडा येथे कोरोना लसीकरणाला उस्फुर्त प्रतिसाद.

Bhairav Diwase
0
नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात २००० च्या वरती नागरिकांना कोरोनाचे लसीकरण.

नागरिकांनी न घाबरता लसीकरण घ्यावे:- वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नील टेंभे.

लसीकरणाचा नागरिकांनी लाभ घ्यावा:- भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने
Bhairav Diwase.    April 14, 2021
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.कोरपना तालुक्यातील आत्तापर्यंत जवळपास २००० च्या वरती नागरिकांचे कोरोना लसीकरण झालेले आहेत.या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नील टेंभे यांच्या मार्गदर्शनात अतिशय उत्तम कार्य कोरोना लसीकरणाचे सुरू आहे.४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्यात येत आहे.कोरपना तालुक्यातील सर्वांधिक कोरोना लसीकरण हे नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेले आहे.
                
       यावेळी नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाची भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी पाहणी केली.यावेळी लसीकरणाकरीत तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थीत होते.
                               
       कोरपना तालुका हा आदिवासी बहुल व ग्रामीण भागाने व्यापलेला असूनसुद्धा या आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण हे २००० च्या वरती गेलेले आहेत.यासाठी या आरोग्य केंद्रात यंत्रणा हे अतिशय उत्तम कार्य करीत आहे.त्यामुळेच कोरोनाच्या लसीकरण सध्या दररोज २००च्या वरती नागरिकांना देण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी न घाबरता कोरोनाचे लसीकरण घ्यावे व लसीकरण केल्याने कोणतीही  प्रकृतीसंदर्भात कोणतीही समस्या उद्भवणार नाही.तसेच नागरिकांनी सोबत येताना आधार कार्ड व आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल क्रमांक सोबत आणावे अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नील टेंभे यांनी केले आहे.
                                   
           तसेच कोरोनापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्याकरीता नागरिकांनी कोरोनाचे लसीकरण करावे.व समाजात लसीकरणाबाबत जनजागृती करावी व तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात या लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)