वेकोली च्या C S R फंड वाटपात दुजाभाव?

माथरा गाव कोळसा खाणीतील ब्लास्टिंगमुळे प्रभावित.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा येथील तीन किमी अंतरावर असलेल्या माथरा गावा च्या विकासात वेकोली प्रशासनाने कोणताही हातभार लावला नसून मागील पांच वर्षपासून गावाला C S R फंडा तुन दमडी सुद्धा मिळालेली नाही. मुळात माथरा गाव सास्ती खुल्या खाणी लगत असल्याने खाणीतील ब्लास्टिंग मुळे प्रभावित होत आहे व याचा मोठा फटका गावकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे वेकोली प्रशासनाने C S R फंड वाटपात दुजाभाव करू नये व गावाच्या सर्वांगिण विकासा साठी मूलभूत सोई सुविधा पुरवाव्या अशी मागणी खामोना ग्राम पंचायत चे सरपंच हरिदास झाडे यांनी केली आहे.
       खमोना ग्राम पंचायत मध्ये माथरा गाव येत असून वेकोली च्या कोळसा खाणी ला लागून आहे.त्यामुळे खाणीतील होणाऱ्या नियमित ब्लास्टिंग मुडे गाव प्रभावित होत आहे.मुळात गाव वेकोली च्या प्रभावित क्षेत्रात येत असल्याने C S R फंड मिळणे अपेक्षित आहे.पण मागील पांच वर्षांपासून गावाला दमडी सुद्धा मिळालेली नाही. यामुळे गावकऱ्यांत मोठा रोष पहायला मिळत आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या ग्राम पंचायत च्या मासिक सभेत C S R फंडा तुन गावाचा विकास करण्या संदर्भात ठराव पारित करण्यात आला आहे . यात मथरा ते सास्ती पांदण शिव रस्त्यावर घिसा टाकण्या सोबतच गावात पाणी शुद्धीकरण माशिन,नाली बांधकाम, समाजमंदिर, वाचनालय, व रस्ता बांधकामाकरिता निधी उपलब्ध करून देण्या बाबत ठराव मंजूर करण्यात आला आहे.गावाच्या सर्वांगिण विकासा करीता वेकोली  प्रशासनाने C S R फंडाचे वाटप करतांना माथरा गावाला प्राधान्य द्यावे अशी मागणी सरपंच हरिदास झाडे यांनी केली आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने