Top News

विरूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्र त्वरित सुरू करावे.

माजी वित्त मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे माजी आमदार अँड. संजय धोटे यांच्या माध्यमातून हितेश गाडगे यांची मागणी.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- तालुक्यातील विरुर स्टेशन येथे प्राथमिक आरोग्य केंद्र चे बाधकाम  पूर्णतः झालेले असून उपरोक्त बांधकामास अँड.संजय धोटे मा.आमदार यांच्या कार्यकाळात निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. पंरतु विरुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम पूर्ण होऊन सुद्धा  आद्यपही आरोग्य केंद्र सुरू झालेले नव्हते त्यामुळे विरुर व परिसरातील नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.सदर बाबीची दखल घेत भाजयुमो सोशल सोशल मीडियाचे जिल्हा संयोजक हितेश गाडगे यांनी माजी आमदार अँड.संजय धोटे यांच्या माध्यमातून माजी वित्त मंत्री तथा पालकमंत्री,आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे विरुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तात्काळ सुरू करण्याबाबत मागणी केली आहे.
कोरोणाचे पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा सुरळीतपणे नागरिकांना उपलब्ध व्हावी यासाठी मा.आमदार अँड. धोटे यानी शासनाला व पुर्व कँबिनेट मंत्री तथा लोकलेखा समितीचे प्रमुख मा.श्री .सुधीर  मुनगंटीवार यांना निवेदनाद्वारे केलेली आहे.

जिल्हा वार्षिक योजणे अत्तर्गत उपरोक्त बांधकामास सहा कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले होते. जिल्हा परिषद चंद्रपूर बाधकाम विभाग द्वारा उपरोक्त रुग्णालयाचे  बांधकाम पूर्ण करण्यात आले असून सदर रुग्णालय आरोग्य विभागाच्या वतीने हस्तांतरित करून त्वरित सुरू होणे आवश्यक आहे. सदर रुग्णालयात उपचारासाठी तातडीने  साहित्य उपलब्ध करून द्यावेत व पदभरती करावी अशी मागणी करण्यात आली.  

लोकलेखा समितीचे प्रमुख तथा पूर्व कँबिनेट मंत्री मा.श्री. सुधीर मुनगंटीवार साहेब यानी मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर याना  कोरोणाचे पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र त्वरित सुरू करण्यासाठी उपरोक्त कार्यवाही त्वरित करावी असे सांगितले. 

 या क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी तथा गावकऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र त्वरित सुरू करावे अशी विनंती अँड संजय धोटे मा.आमदार याना केलेली होती. सदर रुग्णालय सुरू झाल्यास त्या क्षेत्रातील नागरिकांना आरोग्य तपासणी करिता ईतरत्र जावे लागणार नाहीत. त्या भागातील नागरिकांना त्वरित उपचार घेणे सोईचे होईल.
 यावर माजी वित्त मंत्री तथा पालकमंत्री,आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संपर्क करून विरुर येथील आरोग्य केंद्र सुरू करण्याबाबत सूचना वजा आदेश दिले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने