स्पर्धेत एक गोल्ड, दोन सिल्व्हर आणि डेमो मध्ये पाहिले बक्षीस ट्रॉफी प्राप्त.
पोंभुर्णा:- नुकत्याच झालेल्या तिसरे नॅशनल ओपन कुंग-फु कराटे चॅम्पियनशिप 2021-22 हि दि. 04/04/20210 वरोरा येथील बावणे मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये 300-400 स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत उमरी पोतदार ता. पोंभुर्णा येथील मुलांनी विजयी होऊन स्वतः सोबत गावाचे नाव उंचावले. या स्पर्धेत एक गोल्ड दोन सिल्व्हर आणि डेमो मध्ये पाहिले बक्षीस ट्रॉफी प्राप्त केली . याचा संपूर्ण श्रेय या मुलांना घडवणारे मास्टर मुकेश तांडेकर यांना जातो. मुलांना योग्य मार्ग दाखवून आज नॅशनल चॅम्पियन बनवले योग्य दिशा दाखवणारे असेल तर यशस्वी मार्गाने वाटचाल होते आणि मिळते ते म्हणजे "यश".
या स्पर्धेत सहभागी झालेले उमरी पोतदार (ता. पोंभुर्णा) येथील कोमल पेंदोर,अंकुश उराडे, स्वप्नील ठाकरे, महेश कुळमेथे, अमित कुंभरे, वैभव ठाकरे, आशिष साउलकर, अजिंक्य कुंभरे, अनिल सतार यांनी सहभाग होऊन मुलांनी केलेल्या श्रमाचे फळ त्यांनी विजय संपादन करून मिळवले.
तिसरे नॅशनल ओपन कुंग-फु कराटे चॅम्पियनशिप 2021-22 चे आयोजक मास्टर प्रवीण रामटेके यांनी कोरोना सारख्या विषाणूचा संक्रमण होऊ नये म्हणून खूप चांगल्या प्रकारे उपाययोजना केल्या होत्या व आयोजन अतिशय चांगल्या प्रकारे आयोजित करून ही स्पर्धा यशस्वी रीत्या पार पाडली.
या स्पर्धेमध्ये बाहेरून आलेल्या टीम ने सुद्धा आपले कला दाखवली, शेवटी स्पर्धा आहे कोणी जिंकतो तर कोणी हरतो. मेहनत करेल, जो करत राहणार मेहनत त्याला शेवटी यश मिळतोच हेच उमरी पोतदार च्या मुलांनी आज या स्पर्धेमध्ये विजयी होऊन दाखवून दिले आहे. आणि या मुलांचा सत्कार, मान सन्मान म्हणून गावातील सरपंच व सदस्य, गावकऱ्यांनी विजयी झालेल्या सगळ्या मुलांचा या प्रसंगी स्वागत करण्यात आला. यामध्ये सरपंच ठामेश्वरी लेनगुरे, उपसरपंच मंगेश उपरे व अनिल पेंदोर ठावुरदास उराडे आदी उपस्थित होते.