Top News

तिसरे नॅशनल ओपन कुंग-फु कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेतील विजेत्यांच आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल संतोषवार सदस्य, जिल्हा परिषद चंद्रपुर यांच्या हस्ते सत्कार.

तिसरे नॅशनल ओपन कुंग-फु कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत पोंभुर्णा तालुक्याचा वाजला डंका.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- नुकत्याच झालेल्या तिसरे नॅशनल ओपन कुंग-फु कराटे चॅम्पियनशिप 2021-22 हि दि. 04/04/20210 वरोरा येथील बावणे मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये 300-400 स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत उमरी पोतदार ता. पोंभुर्णा येथील मुलांनी विजयी होऊन स्वतः सोबत गावाचे नाव उंचावले. या स्पर्धेत एक गोल्ड दोन सिल्व्हर आणि डेमो मध्ये पहिले बक्षीस ट्रॉफी प्राप्त केली . याचा संपूर्ण श्रेय या मुलांना घडवणारे मास्टर मुकेश तांडेकर यांना जातो. मुलांना योग्य मार्ग दाखवून आज नॅशनल चॅम्पियन बनवले योग्य दिशा दाखवणारे असेल तर यशस्वी मार्गाने वाटचाल होते आणि मिळते ते म्हणजे "यश".

       या स्पर्धेत सहभागी झालेले उमरी पोतदार (ता. पोंभुर्णा) येथील कोमल पेंदोर,अंकुश उराडे, स्वप्नील ठाकरे, महेश कुळमेथे, अमित कुंभरे, वैभव ठाकरे, आशिष साउलकर, अजिंक्य कुंभरे, अनिल सतार यांनी सहभाग होऊन मुलांनी केलेल्या श्रमाचे फळ त्यांनी विजय संपादन करून  मिळवले.

     
   
तिसरे नॅशनल ओपन कुंग-फु कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेतील विजेत्यांच आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल संतोषवार सदस्य जिल्हा परिषद चंद्रपुर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी सरपंच ठामेश्वरी लेनगुरे, उपसरपंच मंगेश उपरे, मनोज मुलक्लवार, जयंत पिंपळशेंडे, चंद्रशेखर झगडकर, लक्ष्मण गव्हारे, भैरव दिवसे, स्वप्निल पिंपळशेंडे, राहुल वासेकर उपस्थित होते. 

   या स्पर्धेमध्ये बाहेरून आलेल्या टीम ने सुद्धा आपले कला दाखवली, शेवटी स्पर्धा आहे कोणी जिंकतो तर कोणी हरतो. मेहनत करेल, जो करत राहणार मेहनत  त्याला शेवटी यश मिळतोच हेच उमरी पोतदार च्या मुलांनी आज या स्पर्धेमध्ये विजयी होऊन दाखवून दिले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने