चंद्रपूरात सोशल मीडियावर व्हायरल होणारा "तो" मेसेज फेक.

Bhairav Diwase
सोशल मीडियावर व्हायरल होतोय "संदेश".

जिल्हा माहिती कार्यालय व्दारे जनतेस माहिती आवाहन.


चंद्रपूर:- जिल्हाधिकारी व जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूर यांच्या नावाने विविध १६ प्रकारच्या सूचना ( शेजारी येणे जाणे बंद करावे, दुधाच्या पिशव्या धुऊन घ्यावे, वृत्तपत्रांना हात लावू नये इ. ) असलेला फेक मेसेज व्हाट्सअप ग्रुपवर व्हायरल होत आहे. सदर मेसेजचा जिल्हा प्रशासनाशी काहीही संबंध नाही. सदर मेसेज पूर्णपणे चुकीचा व अफवा पसरविणारा असून अशा कोणत्याही सुचना जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्याकडून देण्यात आल्या नाही.

तसेच या मेसेजवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा माहिती कार्यालयाकडून करण्यात आले आहे.