Top News

सच्चा, प्रेमळ, स्वभावी नेता हरपला:- भुजंगराव ढोले शहर अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पोंभुर्णा



पोंभुर्णा:- स्व. गजानन गोरंटीवार हे शांत, सच्चा प्रेमळ स्वभावी नेते होते भारतीय जनता पार्टी तालुका पोंभुर्णा चे अध्यक्ष, पोंभुर्णा न. प. माजी अध्यक्ष असा त्याचा प्रवास जरी असला तरी ते पोंभुर्णा तालुक्यासाठी ते वन म्यान आर्मी च होते त्याचा जाण्याने पोंभुर्णा व तालुक्याच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पोंभुर्णा भाजपा तालुकाध्यक्ष गजानन गोरंटीवार यांच्या निधनाची वार्ता ऐकून मन सुन्न झाल. पोंभुर्णा शहर असो वा तालुक्‍याचा ग्रामीण भाग भाजपाचे संघटन बळकट करण्‍यासाठी त्‍यांनी अविश्रांत परिश्रम घेतले. जनतेच्‍या हाकेला तत्‍परतेने ओ देणारा हा नेता पोंभुर्णा तालुका भाजपाची जमेची बाजु होती. अतिशय शांतपणे, संयमितपणे जनतेचे प्रश्‍न मांडणारा व्यक्ती म्‍हणुन त्‍यांनी आपली ओळख निर्माण केली होती. गजानन गोरंटीवार हे जग सोडुन जाणे ही बाब प्रचंड धक्‍कादायक आहे, या बातमीवर माझा काही काळ विश्‍वासच बसला नाही. त्‍यांच्‍या निधनाने भाजपा परिवारासह एकुणच राजकीय व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्‍यांच्‍या परिवारावर कोसळलेले दुःख मोठे आहे. या दुःखातुन सावरण्‍याचे बळ त्‍यांच्‍या कुटुंबियांना परमेश्‍वर देवो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने