अधुरी एक कहाणी..! अंगावरची हळद उतरली नाही आणि काळाने घात केला. #death

Bhairav Diwase
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गोंडपिपरी:- शहरातील इंदिरानगर भागातील रहिवाशी मोरेश्वर मशाखेत्री यांचा लहान मुलगा शंकर याचे 21 दिवसा अगोदर गडचिरोली जिल्ह्यातील पारडी या गावातील राणी नावाच्या मुलीशी दिनांक 08/04/2021 रोजी विवाह झाला.

विवाहाच्या रेशीम बंधनात अडकून त्यांनी संसाराचा गोडवा अनुभवायला सुरूवात केली. लग्न होऊन 21 दिवस लोटले नाही, अश्यात त्या नवविवाहित जोडप्यांना कुणाची तरी नजर लागली. लग्नाच्या काही दिवसातच शंकरच्या पत्नीच्या प्रकृतीत बिघडली. त्याने तिला बऱ्याच डॉक्टरांकडे दाखवले तरी प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. शेवटी आई वडिलांच्या भेटीने तरी तिला बरे वाटेल या हेतूने तिला तिच्या माहेरी नेले. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार औषोधोपचार सुरूच होते. पण काळ कुणावर कसा, कधी आणि कुठे झेप घेणार सांगत येत नाही. अश्यात राणीच्या प्रकृतीत अस्वस्थता जाणवायला लागली आणि अकस्मात तिने शंकरचा हात सोडला तो पण कायमचा.

अंगावरची हळद उतरली नाही, संसाराचा गाडा ओढण्याच्या शर्यतीत, कोरोणाच्या प्रतिकूल परिस्थितीत काल बुधवारला दुपारी तिने अखेरचा श्‍वास घेतला. तिच्या अश्या अकस्मात जाण्याने शंकर वर दुःखचा डोंगर कोसळला असून दोन्ही परिवार शोकाकुल परिस्थितीत आहेत. शंकरच्या पत्नीच्या मृत्यूची बातमी गावात पसरताच त्यावर कुणालाच विश्वास बसत नव्हता.