पोंभुर्णाचा राजकीय गुरू हरपला:- आकाश तिरुपत्तीवर मनसे तालुकाध्यक्ष पोंभुर्णा

Bhairav Diwase
झुंजार वादळ शमले....! आशिष नैताम तालुकाध्यक्ष मनविसे पोंभूर्णा

पोंभुर्णा:- नवनिर्मित पोंभुर्ण्याला आकार देणारा पोंभुर्णाला महाराष्ट्रात ओळख मिळवून देण्यासाठी झटणारा लोकनेता गजानन गोरंटीवार काल अखेर काळाने हिरावून घेतला. भाजपा पोंभुर्णा तालुक्याचे भाजपा अध्यक्ष गजुभाऊ गोरंटीवार यांच्या सारख्या देवदुर्लभ कार्यकर्त्याचे निधन वेदनादायी आहे.अजुनही या बातमीवर विश्र्वास बसत नाही.

राजकीय पक्षात बहुतेकांना सगळचं काही लवकर मिळण्याची अपेक्षा असते. त्यासाठी वाटेल ते करुन मिळवायचे हा प्रघात नेत्यांसाठी, संघटण चालविणाऱ्यां साठी चिंतेचा विषय ठरतोय, पण आ. सुधीर भाऊंनी ठरवुन असंख्य कार्यकर्त्यांना आपल्या विधानसभेच्या पक्षसंघटना बांधणीत त्यांच्या गुणदोषांसकट स्विकारले, त्यांच्यावर अकृत्रिम प्रेम केले. त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या देत पक्षाचे अभ्यासवर्ग, मेळावे, कार्यक्रम, बैठका, प्रशिक्षण वर्ग इत्यादी माध्यमातून संस्कार करीत मोठे केले. पण जनता आणि पक्षसंघटना यांचा समन्वय घडवुन आणणारे कार्यकर्ते व त्यांची शृंखला उभारणारे आ. सुधीर भाऊ यांच्या व्यक्तिगत कार्यकर्ता परिवारातील गजुभाऊ हा पहिल्या फळीतला आवडता कार्यकर्ता होता.