जिवती तहसीलदारांना निवेदन.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- मरकागोंदी ग्रामपंचायत येथिल मनरेगा कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असुन सदर भ्रष्टाचार हा शासकीय मानधन प्राप्त व्यक्तींनी पदाचा दुरूपयोग करून केला आहे करिता महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना कायदा २००५ अन्वये केंद्र शासनाने ग्रामीण भागातील अकुशल बेरोजगार व sc,st दुर्बल घटक व बेरोजगार महिला यांना हक्काचे १०० दिवसांचा रोजगार मिळावा म्हणून सुरू केलेली असुन ग्रामपंचायत मरकागोंदी येथिल सदर शासकीय मानधन प्राप्त व्यक्तीं या भ्रष्टाचारात सामील असल्याचे उघडकीस येत आहे यात २०१५ ते २०२१ या कालावधीत या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची शक्यता नाकारता येत नाही याची तत्कालीन राजकीय व्यक्तींशी संबंधित असुन हा भ्रष्टाचार गंभीर स्वरूपाचे असुन यांची तत्काळ चौकशी करण्यात यावी सदर भ्रष्टाचार हा कोरोना काळात झालेला असुन आपत्ती काळामध्ये शासकीय निधीचा व पदाचा गैरवापर करणाऱ्यांवर विविध कायद्याअंतर्गत गुन्हा नोदवुन निलंबनाची कार्यवाही करावी अस्या मागण्यांसह श्नी सुनील संभाजी कांबळे यांच्या कडून जिवती तहसीलदारां मार्फत मा. गट विकास अधिकारी मा. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले