Top News

ब्रम्हपुरी मधील टोल नाका ठरत आहे रुग्णाला घातक?

कोरोना रुग्ण गाडीत असताना सुद्धा गाडी रोखून पैसे वसुली?

कोरोना मध्ये कसली टोल द्यायची अशी सामाजिक संघटनेची मागणी.
(संबंधित छायाचित्र)
ब्रम्हपुरी:- नागभीड ते ब्रह्मपुरीच्या दरम्यान टोल नाका सुरु झालेला आहे. मात्र या टोल नाक्यावरील असलेले कर्मचारी हे गाडीची चौकशी न करता डायरेक्ट ड्राइव्हर लोकांन सोबत शिवागीळ ची भाष्या वापरून त्यांच्या कडून जबरदस्तीने टोल नाक्याचे पैसे घेत आहेत.
वास्तविक पाहता कोरोनाच्या काळात टोल नाके बंद असायला पाहिजे होते मात्र कोरोनामध्येच टोलनाका सुरु असल्याने अनेक कोरोना रुग्णांना तिथेच आपले जीवन संपवा लागत आहे. ड्राइव्हर लोकांनी टोलनाक्याचा कर्मचारी लोकांना सांगत असून शुद्ध ते लोक एकाला तयार नाहीत. त्यामुळे सामाजिक युवा ब्रिगेड संघटनेची मागणी आहे कि टोल नाका हा कोरोनाच्या काळात बंद ठेवावे किंवा जे रुग्णाची सेवा करणयास गाडी लावली आहे त्यांना तुरंत मध्ये हॉस्पिटल मध्ये जाऊ देण्यात यावे.


       अनेक कोरोना लोकांना चंद्रपूर किंवा ब्रह्मपुरी हे दोनच हॉस्पिटल चे मार्ग जवळ असल्यामुळे जास्त करून तिथेच नेत असतात. त्यामुळे ब्रह्मपुरीला एकदम जवळ मार्ग असल्यामुळे अनेक कोरोना रुग्ण तिथे नेत असतात. मात्र अश्या टोलनाक्याच्या त्रासामुळे लोक आता खूप दुःख वेक्त करीत आहेत. कारण इकडे लोक मुठीत जीव ठेवून तात्काळ मध्ये ब्रह्मपुरी हॉस्पिटल मध्ये जात असतात अश्या वेळेस थोडासा लेट झाल कि जीवन तिथेच सोडावा लागत आहे. त्यामुळे टोलनाका लवकरात लवकर बंद करावे किंवा योग्य कर्मचारी लोकांना मार्गदर्शन करावे अशी मागणी सामाजिक युवा ब्रिगेड संघटने कडून तसेच सर्व जनते कडून होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने