(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रितेश एस. आसमवार, चामोर्शी
चामोर्शी:- कोरोनाच्या प्रादुर्भामुळे मा. जिल्हाधिकारी यांनी केवळ २५ जणांची लग्न सोहळा करीता परवानगी दिल्याने मुधोली रिठ येथील कोरोना दक्षता समतीने मुधोली रिठ येथील रहिवासी श्रीमती-चन्द्र्कालाबाई साईनाथ मडावी यांची मुलगी कु-आरती साईनाथ मडावी हिचा विवाह श्री-कैलास विनायक मेश्राम रा-नवेगाव पेट ता-चिमूर जि.चन्द्रपूर यांचाशी दि.२१-०४-२०२१ रोजी बुधवारला मौजा मुधोली रिठ येथे आयोजित केलेले होते. परंतु मा.जिल्हाधिकारी साहेब यांच्या आल्याल्या पत्रानुसार गावातील कोरोना दक्षता समितीने सदर पत्राची परिपूर्ण जाणीव करून व शासनाच्या निममाच्या पालन करून. अगदी २५ लोकामध्ये सदर लग्न पार पाडला असून. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन गावातील कोरोना दक्षता समितीने गावामध्ये असलेल्या एकूण-०३ घरी भेटी देऊन लग्न सोहळा शासनाच्या निममानुसार पार पाढण्यात यावे असे मार्गदर्शन करण्यात आले.व त्यासंदर्भात पत्र देखील देण्यात आले.तरी सदर गावातील असणारे संपूर्ण लग्न असे शांततेत व शासनाच्या नियमानेच पार पाडू असे संपूर्ण गावकर्यांनी आपले कोरना दक्षता समितीला सांगितले.
मुधोली रिठ येथील कोरोना दक्षता समितीने अगदी २५ लोकांमध्ये आटोपला लग्न सोहळा. Marriage
गुरुवार, एप्रिल २२, २०२१