पोंभुर्णा तालुक्यातील चेक पोंभुर्णा जवळील घटना.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार पोंभुर्णा तालुक्यातील उमरी येथील रहिवासी भाऊजी तोडासे, गुरुदास कोडापे हे दि. (13 एप्रिल) कामानिमित्त दुचाकीने चिचाळा हळदी (ता. मुल) येथे गेले होते. काल काम झाल्यानंतर सायंकाळच्या सुमारास आपल्या गावाला परत येत असताना चेक पोंभुर्णा जवळ बैलबंडी ला दुचाकीची धडक बसली असता या घटनेत भाऊजी तोडासे यांचा मृत्यू झाला असून गुरुदास कोडापे हे जखमी झाले. जखमीला पोंभुर्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.