Top News

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती शहरातील जवळे प्लाॅट येथे राहणाऱ्या एका युवकाने घरातच दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. १३ ला पहाटे ४ वाजता उघडकीस आली. मयूर विजय भुसे (२०) असे मृतक युवकाचे नाव आहे.

घटनेच्या दिवशी पहाटे ४ वाजता त्याची आजी पाणि भरण्यासाठी उठली असता घटना स्वयंपाकघरात स्लॅबला असलेल्या एका हुकात दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मयूर आढळून आला. तेव्हा ही घटना उघडकीस आले. आत्महत्येचे अधिकृत कारण कळू शकले नाही. आईवडील यापूर्वीच वारले असल्याने याचा व त्याच्या लहान भावाचा सांभाळ त्याची आजी व काका काकू करीत होते.  या घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व शव शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे पाठविले.सदर घटनेचा अधिक तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने