Top News

भद्रावतीत विकेंड लाॅकडाऊनमध्येही लोकांची भ्रमंती सुरूच.

250 रूपयाची बाॅटल 500 रूपयात.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- महाराष्ट्र सरकारने संपुर्ण राज्यात विकेंड लाॅकडाऊन शुक्रवारी राञी आठ वाजता पासुन सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत घोषित करून सचांरबंदि जारी केली होती. माञ भद्रावती शहरात भाजीपाला, औषधे, फळे, हि दुकाने सोडली तर सर्वच दुकाने बंद होती. परंतु तळिराम आणि खर्रा शोकिनानसाठी आवश्यक असणारी  अवैध दारू व खर्रा  विक्री केंद्रे सर्रास सुरू होती. या लाॅकडाऊन चा फटका व्यापारी वर्गासोबतच तळिरामांना सुध्दा बसल्याचे चिञ दिसुन आले.

          लाॅकडाऊन पुर्वि अडिचशे रूपयात मिळनारी  विदेशी दारूची बाॅटल चक्क पाचशे रूपयात विकल्या गेल्याची तळिरामांमध्ये चर्चा आहे. तसेच पन्नास रूपयाची देशी दारूची बाॅटल शंभर रूपयात विकल्याची चर्चा आहे. या अचानक वाढलेल्या अवैध दारूचा किंमती मुळे काही तळिरामांनी तालुक्यातील तांडा येथील हातभट्टिच्या दारूचा आसरा घेतला. परंतु तेथे सुध्दा नेहमी विस ते तिस रूपयात मिळानारा ग्लास चाळीस ते पन्नास रूपयामध्ये विकत घ्यावा लागल्याने तळिरामांना या लाॅकडाऊन चा चांगलाच फटका बसला. खर्याची दुकाने सुध्दा सर्रास सुरू होती. त्यामुळे खर्रा शोकिनांनी या दुकानावर गर्दी करून संचार बंदि चा फज्जा उडविला. तसेच रस्त्यांने नागरिकांचे जाने येने चालुच होते. त्यामुळे लाॅकडाऊन केवढ व्यापारीवर्गासाठीच होता का? असा प्रश्न काही सुध्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने