घरात घुसून वाघाचा हल्ला; महिला गंभीर जखमी.

Bhairav Diwase
0
Bhairav Diwase. April 17, 2021
सिंदेवाही:- सिंदेवाही वनपरिक्षेत्राअंतर्ग येत असलेल्या खैरी येथे रात्रौला वाघाने सुनंदा मेश्राम वय 60 वर्ष यांच्या वर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली.

अगोदर वाघाने शेळीवर हल्ला केला. हल्ला करून घरातील दरवाज्यावर थाप दिली. खैरी येथील महिलेवर रात्रौच्या सुमारास सुनंदा मेश्राम ही गाढ झोपेत असताना दरवाजाचा आवाज आला. "कुनी तरी आलं" असं सुनंदाला वाटलं. बघतो तर डोळ्यासमोर तिला वाघ दिसला. डोळ्याची पापणी हालाच्या आत तिच्यावर वाघाने हल्ला केला. त्यानंतर आरडा ओरड करताच गावकरी लोकांनी त्याला परतवून लावले. तिला उपचाराकरीता रूग्णालयात भरती करण्यात आले आहे.

सदर परीसरात तिसरी घटना असून परीसरात भितीची दहशत पसरली आहे. पुन्हा या घटनेने मानव व वन्यजीव संघर्ष सुरू झाला असल्याचे चर्चेला पेव फुटला आहे.
जंगलातले वाघ आता गावात येवू लागल्याने आता जगायचे कसे? असा प्रश्नही या निमित्याने उपस्थित केला जात आहे. अशा घटना घडल्या की वनविभागाकडून जंगलात न जाण्याचा सल्ला दिला जातो. परंतु गावात घटना घडल्यावर आता गावच सोडायचे का? असाही नागरीकांमध्ये चर्चा सुरू आहे. वनविभाग या घटनेकडे गांभीर्याने घेतील काय? की असाच मानव वन्यजीव संघर्ष सुरू राहील ही येणारी वेळच ठरवेल!

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)