Top News

राजमाता अहिल्यादेवी होळकर व इंदिराआई कडू यांच्या वाढदिवसानिमित्य ऐकल महिला आधार योजना.

टॅक्टर आमचं, डिझेल तुमचं... निराधार महिलांना मोफत उदीम.
Bhairav Diwase.    April 17, 2021
चंद्रपूर:- घरातील कर्त्या पुरुषाच्या जाण्याने शेतकरी कुटुंबातील एकल महिलांना किती यातना सोसाव्या लागतात ते आपल्याला माहीत आहे. केवळ पैशाअभावी शेती कसता येत नाही. त्यामुळे नाईलाजास्तव त्यांना इतर ठिकाणी मोलमजुरी करावी लागते.
या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही “राजमाता अहिल्यामाई होळकर” यांच्या जयंती निमित्त आणि राज्यमंत्री मा.ना.बच्चुभाऊ यांच्या आई “इंदिराआई कडू” यांच्या वाढदिवसानिमित्त
 “ट्रॅक्टर आमचा, डिझेल तुमचे” 
 ही योजना आखली आहे. या योजनेमध्ये निराधार एकल महिलांना मोफत उदीम करुन दिला जाणार आहे. 
मागील महिन्यात मतदारसंघातील निराधार महिलांची नोंदणी करण्यात आलेली आहे. आज मासोद या गावी उदीम करण्यात आला. या योजनेअंतर्गत शेतीतील उदीम, पेरणी ही सर्व कामे राज्यमंत्री मा.ना.बच्चुभाऊ कडू यांच्यामार्फत मोफत करण्यात येईल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने