विहिरीच्या आत गळफास घेऊन इसमाची आत्महत्या.

Bhairav Diwase
0


सिंदेवाही:- सिंदेवाही पोलीस स्टेशनंतर्गत नांदगाव येथे शेतकरी मंगेश सावसागडे यांच्या शेतातील विहिरीच्या आत 30 वर्षीय अमर नामदेव बोरकर यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

चिकलगाव येथे बोरकर हे आपल्या सासुरवाडीत साळीच्या लग्नासाठी आले होते‌. मात्र 16 एप्रिलला सकाळी 7.30 वाजताच्या दरम्यान शेतातील विहिरीच्या आतील लोखंडी सळाखीला गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांना याबाबत सकाळी 10 वाजता माहिती मिळाल्यावर घटनेचा पंचनामा केला. शव ताब्यात घेत शवविच्छेदनकरिता पाडण्यात आले असून पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)