#पालकमंत्री वडेट्टीवार राजीनामा द्या. काल सोशल मीडियावर व्हायरल झाला मेसेज.

Bhairav Diwase
आज चक्क पालकमंत्री वडेट्टीवार ची "मिसिंग" पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल.


चंद्रपूर:- काल #पालकमंत्री वडेट्टीवार राजीनामा द्या असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. काल जिल्ह्यातील नागरिक सोशल मीडियावर संताप व्यक्त करत होते. आणि कारण पण तसच होतं.

चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा मतदारसंघ असलेल्या ब्रह्मपुरीत काल वैद्यकीय उपचाराच्या अभावी एका तरुणाचा कोरोनाने मृत्यू झाला. स्वतःचा मतदारसंघ ज्या मंत्र्याला सांभाळता येत नाही तो जिल्हा आणि राज्य काय सांभाळणार? असा सोशल मीडियावर प्रश्न जनतेकडून उपस्थित केला जात होता.


आज चक्क ना. वडेट्टीवार ची "मिसिंग" पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल.
आज चक्क ना. वडेट्टीवार ची "मिसिंग" पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्या पोस्ट मध्ये मजकूर लिहिला आहे.

🔴Missing...
(हरविले आहे)

पालक खाया मंत्री विजय वडेट्टीवार ब्रह्मपुरी विधानसभा.

तुम्ही जिथे कुठे असाल ताबडतोब परत या व बिघडलेली परिस्थिती सांभाळा तुमचे मतदार तुमची मोठ्या अपेक्षेने वाट पाहात आहेत.

तुम्ही या लवकर.. तुम्हाला कुणीच काही बोलणार नाही. तुमच्यावर रागवणार नाही. नाराज पण होणार नाही.

असा मजकूर या पोस्टमध्ये असून त्यावर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे फोटो देखील लावण्यात आलेले आहे.

जिल्ह्यातील कोरोना आपत्ती प्रशासनाच्या हाताबाहेर गेल्याचे चित्र असून, हवालदील जिल्हावासीयांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा मिळू शकतो, मात्र ते जिल्ह्याकडे फिरकत नसल्याने आरोग्य यंत्रणा वाऱ्यावर आहे. याच असंतोषातून पालकमंत्री वडेट्टीवार यांचे संदर्भात ही पोस्ट फिरत आहे.