Top News

जिवती तालुक्यातील ग्राम पंचायत कर्मचारी आज पासून बेमुदत संपावर.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- ग्राम पंचायत कर्मचारी यांनी विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री यांना ३१ मार्च २०२१ पर्यंत मागण्या मान्य करण्यासाठी दिले होते निवेदन. राज्य ग्राम पंचायत कर्मचारी यांनी दिनांक १५/०३/२०२१ रोजी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व ग्राम विकास मंत्री यांना महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी संघटने तर्फे निवेदन दिले होते.

मात्र त्यांच्या मागण्या अद्यापही मंजूर न झाल्यामुळे जिवती तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर बसले असुन ६० हजार कर्मचाऱ्यांचे वेतनाचा प्रश्न २० वर्षांपासून प्रवलंबीत असून याबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी १० जुलै २०१८ रोजी नागपूर येथील लॉगमार्च व ०७ जानेवारी २०१९ ला लातूर येथे भव्य अधिवेशन केले होते. दि.१० जुलै २०१८ रोजी तत्कालीन ग्राम विकास तथा राज्यमंत्री दादा भुसे यांनी मागण्या मंजूर करण्याबाबत आश्वासन दिले होते.तसेच ०७ जानेवारी ला लातूर येथे ग्राम विकास मंत्री व कामगार मंत्री यांनी अधिवेशनात उपस्थित राहून मार्गदर्शन केले होते व आश्वासन सुद्धा दिले होते. मात्र ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंबंधी अद्यापही निर्णय झालेला नाही त्यामुळे राज्यातील ६० हजार ग्रामपंचायत कर्मचारी हे विविध मागण्यासंबंधीत बेमुदत संपावर आहेत

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने